Aurangabad: दारूच्या नशेत डॉक्टरचा गोंधळ, रुग्णाला शिविगाळ

Aurangabad: दारूच्या नशेत डॉक्टरचा गोंधळ, रुग्णाला शिविगाळ

| Updated on: May 07, 2022 | 10:03 AM

औरंगाबादच्या बाजार सांगवी येथील आरोग्य केंद्रामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने दारूच्या नशेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाला शिविगाळ करत, गोंधळ घातला.

औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क डॉक्टरनेच दारू पिऊन रुग्णालयात गोंधळ घातला आहे. यावेळी संबंधित डॉक्टरकडून  उपचारासाठी आलेल्या रुग्णाला देखील शिविगाळ करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातलया बाजारसांवगी येथील आरोग्य केंद्रामधील हा प्रकार आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये हा डॉक्टर दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

 

Published on: May 07, 2022 10:03 AM