ईडीचा मोर्चा इस्लामपूरकडे; बँकेच्या मुख्य शाखेवर छापा, दोन दिवसात 80 कर्मचारी बँकेतच
ईडीने एकाच वेळी या पाच व्यापाऱ्यांच्या घरी छापेमारी केली. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांची ईडीच्या एकूण 60 अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
सांगली : मूल्यवर्धित कर चुकवल्याप्रकरणी काल ईडीने सांगलीतील पाच व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. ईडीने एकाच वेळी या पाच व्यापाऱ्यांच्या घरी छापेमारी केली. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांची ईडीच्या एकूण 60 अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा इस्लामपुरकडे वळवत येथील राजारामबापू पाटील शेड्युल बँकेच्या मुख्य शाखेवर देखील छापा टाकला आहे. तर येथे पारेख बंधूंच्या खात्यांची चौकशी केली जात आहे. कालपासून चौकशी सुरू असून कालपासून बँकेतील 80 भर कर्मचारी बँकेतच अडकून आहेत.
Published on: Jun 25, 2023 07:21 AM