जळगाव: जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे म्हटले. त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.