Radhakrishana Vikhe Patil At Sangamner | संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना जंगी स्वागत – tv9

| Updated on: Aug 28, 2022 | 1:22 PM

राधाकृष्ण विखे पाटलांना राज्यातील दोन नंबरचे महसूल मंत्री पद देण्यात आलं. त्यानंतर आता विखे समर्थकांनी त्यांची अहमदनगरमध्ये भव्य सत्कार करत जंगी रॅली काढली.

एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर अनेक दिवसानंतर खातेवाटप करण्यात आलं. या खाते वाटपात अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटलांना राज्यातील दोन नंबरचे महसूल मंत्री पद देण्यात आलं. त्यानंतर आता विखे समर्थकांनी त्यांची अहमदनगरमध्ये भव्य सत्कार करत जंगी रॅली काढली. तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संशोधन कार्यालय समोरच विखे पाटलांचा भव्य सत्कार करण्यात आला. विखे पाटलांना क्रेनच्या साह्याने भव्य पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान विखे-पाटील यांनी, जो हमसे टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, अशा घोषणा दिल्या. तसेच या घोषणांमधून त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना एका प्रकारे इशाराच दिल्याचे नगरमध्ये बोलले जात आहे.

Ajit Pawar Video : ‘पूजा कर ना, मी सांगतोय ना!’ जेव्हा अजित पवार पुजेचा मान तरुणीला देतात
Mohit Kamboj | ‘नवाब मलिक आणि संजय राऊत बनु नका’ मोहित कंबोज- TV9