धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड, तीन केंद्रांवर मतदान थांबवलं
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा गटात टक्कर होत असलेल्या परळीत ईव्हीएम मशिनची तोडफोड करण्यात आल्याने मतदान तासभर थांबविण्यात आलेले आहे. धनंजय मुंडे आणि राजासाहेब देशमुख यांच्यात येथे लढत होत आहे.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान सुरु असताना परळी मतदार संघात ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. परळीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजासाहेब देशमुख अशी मुख्य लढत होत आहे. असे असताना परळीतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनची तोडफोड झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या मतदान केंद्रातील सर्व मतदान साहित्याची नासधूस केल्याचे देखील उघडकीस आलेले आहे. या ठिकाणी झालेल्या तोडफोडी नंतर तीन केंद्रांवरील मतदान तासभर थांबविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात कृषीमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चुरशीची निवडणूक होत असताना ही तोडफोड करण्यात आलेली आहे. ही तोडफोड नेमकी कोणी केली याची माहिती अद्याप आलेली नाही.