पुण्याच्या भोर कुंभार गल्लीत गणेश मूर्तींवर अखेरचा हात

| Updated on: Aug 24, 2024 | 4:11 PM

पुण्याच्या भोर येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरु आहे. येथील गणेशमूर्तीना मोठी मागणी आहे.

Follow us on

गणेश चतुर्थीचा सण यंदा शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात डेकोरेशन आणि सजावटी सुरु करण्यास सुरुवात झालेली आहे. यंदा बाप्पाच्या आसनाची व्यवस्था कशी करायची कोणते डेकोरेशन करायचे, तसेच बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा याची देखील तयारी सुरु आहे. पण्याच्या भोर येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्याची लगबग पाहायला मिळत आहे. येथील गणेशमूर्ती प्रचंड प्रसिद्ध आहेत. यंदा सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीत 10 ते 20 टक्के दर वाढ झाली आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पुण्यातील गणेश मूर्तीची आरस किंवा सजावट पाहाण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली असते. संपूर्ण दहा दिवसांत पुणे संपूर्ण बाप्पाच्या भक्तीत लीन झालेले पाहायला मिळते. पुण्याच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक आधी सुरु होते. ही विसर्जन मिरवणूक दोन-दोन दिवस चालते. तर मुंबईची मिरवणूक पहाटेपर्यंत चालते. सकाळी मोठ्या गणपतींचे विसर्जन होत असते.