भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांची तारखेसह सर्व कार्यक्रम जाहीर झालेला असतानाही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागा वाटप काही पूर्ण झाले आहे. अशात भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी वर्ध्यातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल फुंकले गेले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणूकीचे तिकीट वाटप अजूनही जाहीर झालेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गट सत्तर टक्के जागांची वाटणी पूर्ण झाली आहे. उर्वरित जागांवर लवकरच तोडगा निघेल असे म्हटले जात आहे.भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी वर्धा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपात स्वत:हून जाऊन वरिष्ठांना भेटण्याची प्रथा नाही. आपली शिफरस वरिष्ठ नेत्यांनी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरेश वाघमारे हे अनेक वर्षे खासदार होते. आपण पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी वेळोवेळी पाळलेल्या आहेत त्यामुळे आपली निवड व्हावी असे त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.