Maharashtra Politics : कोश्यारी यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला; संजय राऊत यांची सडकून टीका
तसेच त्यांच्यावर खरमरीत टीका करताना त्यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार केलं. यासाठी कोश्यारींनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून कोश्यारी यांच्यावर निशाना साधला. तसेच त्यांच्यावर खरमरीत टीका करताना त्यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार केलं. यासाठी कोश्यारींनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहेच असेही राऊत म्हणाले. तर कोश्यारी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला. त्यांचे हे काम अख्या महाराष्ट्राने पाहिल्याचंही ते म्हणाले. तसेच अशा माजी राज्यपालाला वर्षा बंगल्यावर बोलवून घटनाबाह्य मुख्यमंत्री मिठी मारतात अशी टीका शिंदे यांच्यावर केली आहे. तर माजी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.