या घटनाबाह्य सरकारकडून काय अपेक्षा करणार: यशोमती ठाकूर
राज्यपालांकडून सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल टीका टिपणी केली जाते अशा व्यक्तींकडून आणि घटनाबाह्य सरकारकडून काय अपेक्षा करणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात बंडखोरी नाट्य घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून नाराज असलेले नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनाही उधाण आले आहे. या घटना घडत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्याही आल्या. त्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री आमदार यशोमती ठाकुर यांनी मात्र या सगळ्या अफवा असल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना त्यांनी राज्यपालांवरही निशाणा साधला. राज्यपालांकडून सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल टीका टिपणी केली जाते अशा व्यक्तींकडून आणि घटनाबाह्य सरकारकडून काय अपेक्षा करणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण भाजपात जाणार नसून त्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.