सदाभाऊ खोत यांच्या पवार यांच्यावर त्या टीकेली यशोमती ठाकूर यांचे त्याच शब्दात प्रत्युत्तर; म्हणाल्या, ‘खोत चिल्लर…’

| Updated on: Jul 10, 2023 | 12:37 PM

पवारांना सैतान म्हणत आता हे गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती. त्यावरून खोत यांचा अनेकांनी योग्य समाचार घेतला आहे. खोत यांच्यावर अजित पवार गटाने देखील टीका केली आहे

अमरावती : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली होती. पवारांना सैतान म्हणत आता हे गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती. त्यावरून खोत यांचा अनेकांनी योग्य समाचार घेतला आहे. खोत यांच्यावर अजित पवार गटाने देखील टीका केली आहे. यानंतर आता खोत यांचा काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील समाचार घेतला आहे. ठाकूर यांनी खोत यांची लायकी काढत त्यांना चिल्लर म्हटलं आहे. तसेच खोत यांनी पवार यांच्यावर टीका करण्याआधी आपली लायकी तपासावी असा सल्ला दिला आहे. तर याच्या आधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावरून खोत यांच्यावर टीका केली होती. त्यांनी, सदाभाऊंनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा. कारण पवार साहेबांपासून आम्ही बाजूला झालो जरी असलो तरी आजही ते आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही. त्यांनी आपली उंची पाहून बोलावं असा टोला लगावला होता.

Published on: Jul 10, 2023 12:37 PM
“या बाई पुन्हा लोकसभेवर जाणार नाहीत; त्यांना बजरंगबली धडा शिकवेल”, संजय राऊत यांची टीका
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी खलबत, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य