बुरा ना मानो होली है | 50 खोके एकदम ओके; ठाण्यात धुळवडीतही खोक्यांच्या शुभेच्छा

| Updated on: Mar 08, 2023 | 7:39 AM

ठाण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांमध्येही अशाच शुभेच्छांची देवाण-घेवाण होताना पहायला मिळाली

ठाणे : राज्यात सगळीकडे होळीचे रंग उधळले जात आहेत. बुरा ना मानो होली है | म्हणत एकमेकांना रंग लावले जात आहेत. शुभेच्छा ही दिल्या जात आहेत. ठाण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येही अशाच शुभेच्छांची देवाण-घेवाण होताना पहायला मिळाली. यावेळी केदार दिघे, माजी खासदार आनंद परांजपे आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना दिसत होते. यावेळी आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला उद्देशून बुरा ना मानो होली है | 50 खोके एकदम ओके अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी दिघे यांनी ठाण्याचा इतिहास घडवणारी जोडी दिघे-परांजपे आजही एकत्र असल्याचे सांगितलं.

Published on: Mar 08, 2023 07:39 AM
एसटी महामंडळाच्या बसला दे धक्का! गतिमान सरकारची जाहिरातबाजी होतेय ट्रोल, बघा काय आहे प्रकार?
उदयनराजेंबद्दलचा ‘तो’ निर्णय राज्यसभाच घेईल; शिवेंद्रराजे यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?