Ganpat Gaikwad Firing | असा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालाय, जयंत पाटील यांची टीका

| Updated on: Feb 03, 2024 | 2:59 PM

कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्थानकातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री घडला आहे. या प्रकरणात महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढल्या असल्या तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार होत आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षाने टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातचे राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेत महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार होत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांनी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे आता ही गुन्हेगारी कमी करणे ही सरकारची खरी परीक्षा असेल अशी टीका केली आहे. राज्यातील सरकार कसे चालले आहे हे दाखविणारे ही घटना असून अत्यंत गंभीर आहे. करणारे जे आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला माहीती आहे. राजकीय अभिनिवेश, राजकीय मानसिकता किती बळावलेली आहे की आपण काहीही करु शकतो. आमदार असले तरी आपण पोलिस ठाण्यात जाऊन पाच राऊंड फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही. असे उत्तर प्रदेश-बिहारमध्ये होत असेल महाराष्ट्रात असे कधीच झालेले नाही ते आज झालेले आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Published on: Feb 03, 2024 02:56 PM
Video | गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची केली विचारपूस