“जगभरात पंतप्रधान मोदी यांचा डंका, बाहेर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना कोणी ओळखतही नाही”, भाजपचा टोला

| Updated on: May 29, 2023 | 1:08 PM

भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक देखील केले, तसेच काँग्रेसला उपरोधात्मक टोला लगावला आहे. "एकवीसाव्या शतकात आपला भारत जगद्गुरु होणार आहे. या चार-पाच वर्षात भारत अमेरिकेलाही मागे टाकणार आहे, असं मला वाटतं.

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक देखील केले, तसेच काँग्रेसला उपरोधात्मक टोला लगावला आहे. “एकवीसाव्या शतकात आपला भारत जगद्गुरु होणार आहे. या चार-पाच वर्षात भारत अमेरिकेलाही मागे टाकणार आहे, असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीत यावेळेस भाजप सव्वातीनशेचा आकडा पार करणार आहे. कर्नाटकमध्ये आज काही असू द्या, मात्र कर्नाटकात 28 पैकी 27 खासदार आमचे शंभर टक्के निवडून येतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे, म्हणून आपण कुठे कमी पडलो नाही पाहिजे. जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका आहे, ते कुठे गेले तर गर्दी होते, म्हणून आपल्याला अभिमान पाहिजे की आपण त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. बाहेरच्या देशामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कोणी ओळखत ही नाही. त्यांचं नाव देखील कोणी घेत नाही.आज राहुल गांधी आणि पंतप्रधानांमध्ये कुठे मुकाबला आहे का?”, असा टाला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

Published on: May 29, 2023 01:08 PM
जेजुरीच्या लढ्याला यश येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने दिला शिष्टमंडळाला पाठिंबा, म्हणाला..
मुंबईत आमदारालाच घातला गंडा, 25 लाखांची चोरी अन् 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी