सरकारला आम्ही बारकाईने बघू; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदेना इशारा
संकटग्रस्त शेतकरी आणि मदत यावर भाष्य करताना, महाराष्ट्रवर अशी संकट येतात, दरवेळी पंचनामे पण होतात. मात्र शेतकऱ्यापर्यंत जी मदत जायला पाहिजे ती जात नसल्याचा आरोप केला
मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरू होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून सरकारवर निशाना साधला आहे.
वळसे-पाटील यांनी, कर्मचाऱ्यांनी, संप मागे घेतला हे चांगलंच झालं. मात्र आता सरकार, मुख्यमंत्री यांनी काय काय शब्द, कोणती आश्वासन दिलेली आहेत. ती सरकार कशी पूर्ण करनार आहे. हे आम्ही बारकाईने बघू असे म्हटलं आहे. तसेच संकटग्रस्त शेतकरी आणि मदत यावर भाष्य करताना, महाराष्ट्रवर अशी संकट येतात, दरवेळी पंचनामे पण होतात. मात्र शेतकऱ्यापर्यंत जी मदत जायला पाहिजे ती जात नसल्याचा आरोप केला. तर सरकारने शेतकऱ्यापर्यंत मदत जाण्याच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.