जळगाव : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, म्हणून दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एकप्रकारे दबावाखाली कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. दरम्यान लाभार्थ्यांवर सक्ती नाही, खडसेंच्या आरोपांना अर्थ नाही, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले. ते म्हणाले की, “कोणत्याही लाभार्थ्यांवर आम्ही सक्ती करत नाही, जागृत करण्याच काम आम्ही करतोय. असे कार्यक्रम कोणत्याच सरकारने राबविले नाही आहेत, शिंदे सरकारच्या या कार्यक्रमाला त्यांनी साथ दिली पाहिजे.”