Special Report | ज्ञानवापीच तळघर आणि ‘ती’ 4 रहस्य! मशिदीतला व्हिडीओ सर्व्हे म्हणजे तळघरातलं चित्रीकरण लीक झाल्यामुळे खळबळ
ज्ञानवापी मशिदीतला व्हिडीओ सर्व्हे म्हणजे तळघरातलं चित्रीकरण लीक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओत कुठे मशिदींच्या भिंतीवर त्रिशूळ दिसतंय, तर कुठे कमळाचा आकाराचं नक्षीकाम आहे. आतल्या भिंतीवर स्वस्तिक कोरल्याचंही पाहायला मिळत आहे. काही रहस्यममी कलाकृती समोर आल्या आहेत.
ज्ञानवापी मशिदीतला व्हिडीओ सर्व्हे म्हणजे तळघरातलं चित्रीकरण लीक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओत कुठे मशिदींच्या भिंतीवर त्रिशूळ दिसतंय, तर कुठे कमळाचा आकाराचं नक्षीकाम आहे. आतल्या भिंतीवर स्वस्तिक कोरल्याचंही पाहायला मिळत आहे. काही रहस्यममी कलाकृती समोर आल्या आहेत. कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी मशिदीतल्या एका तळघराचं सर्वेक्षण झालं आणि अधिकारी मंडळी सर्वेक्षणासाठी तळघरात गेली होती. तळघरातल्या व्हायरल व्हिडीओत काय आहे, त्यावरुन काय दावे होत आहेत.
काशीतली काशी विश्वेश्वर मंदिरा शेजारी ज्ञानवापी मशीद आहे. दाव्यानुसार या मशिदीखालच्या तळघरात जाण्यासाठी एकूण 3 ते 4 मार्ग आहेत किंवा मग वेगवेगळ्या 3 ते 4 ते तळघरांसाठी स्वतंत्र 3 रस्ते आहेत. असं म्हटलं जातं की विश्वेश्वर मंदिराच्या लागून मशिदीच्या भिंतीतून एक रस्ता तळघरात जातो. दुसरा मार्ग आहे, मशिदीच्या मागच्या बाजूला, या मागच्या बाजूला एक छोटसं दार आहे. त्यातून सुद्दा एक रस्ता तळघराकडे जात असल्याचं म्हटलं जातं. तिसरा मार्ग म्हणजे मशिदीच्या डाव्या हाताला आणि तलावाच्या बाजूला असलेली दारं. दाव्याप्रमाणे या दारांमधूनही मशिदीखालच्या तळघराकडे जाता येतं.
काशीतल्या काही हिंदू संघटनांच्या दाव्यानुसार तळघरातल्या ज्या भिंती आहेत त्या नव्याने उभ्या केल्या गेल्या आहेत. त्यावर असा दाखला दिला जातो, की तळघरातल्या भिंतींमध्ये अनेक ठिकाणी चुना आणि नव्या विटांचा वापर झालाय. हिंदू संघटनांच्या आरोपांनुसार या भिंतींमागे हिंदू मंदिराची प्रतीकं असणारी अनेक वास्तू निघू शकतात. ज्यात खांब आणि हिंदू मंदिरांच्या आकृतींचा दावा केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे या तळघरात घुमटाच्या आकाराची एक आकृती सुद्धा मिळाल्याचा दावा आहे. हा घुमट मशिदीच्या मध्यवर्ती भागातल्या तळघरात असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे मशिदीच्या तळघरात पुन्हा घुमट कसा असू शकतो, हे सुद्धा कोडं बनलंय.
हा जो फोटो व्हायरल होतोय, हा त्याच तळघरातला फोटो असल्याचा दावा व्हायरल व्हिडीओतून केला जातोय.