राज्यात उष्णतेची लाट, बदलत्या हवामानाचा मान्सूनला फटका

| Updated on: Jun 05, 2022 | 9:59 AM

राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पुढील दोन दिवस अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. विदर्भासह संपूर्ण उत्तर भारतातच उष्णतेची लाट पहायला मिळू शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भासाठी शनिवारी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या महाराष्ट्र प्रवेशास देखील अडथळा निर्माण झाला आहे.

Published on: Jun 05, 2022 09:59 AM
मालवणच्या खोटलेमध्ये आढळली 35 हून अधिक कातळशिल्प
आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक