रामदास कदमांना मी सविस्तर उत्तर देणार- भास्कर जाधव
शिवसेनेतून राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक अंतर्गत गोष्टी समोर आणल्या. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट या दोघांमध्येही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी tv9 मराठीशी विशेष बातचीत केली. यावेळी रामदास कदम यांना मी सविस्तर उत्तर देईल असे ते म्हणाले. सध्या सगळ्या गोष्टींवर मी […]
शिवसेनेतून राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक अंतर्गत गोष्टी समोर आणल्या. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट या दोघांमध्येही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी tv9 मराठीशी विशेष बातचीत केली. यावेळी रामदास कदम यांना मी सविस्तर उत्तर देईल असे ते म्हणाले. सध्या सगळ्या गोष्टींवर मी लाख ठेऊन आहे, सगळी परिस्थिती मी नजरेखालून घालतोय त्यामुळे योग्य वेळ आल्यावर यावर मी सविस्तर उत्तर देईल, याशिवाय रामदास कदम यांना तर मी नक्कीच उत्तर देईल असेही भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Jul 20, 2022 03:01 PM