घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान

| Updated on: Jul 21, 2024 | 4:13 PM

मुंबईत पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुपारी भरतीची वेळ असल्याने मुंबईतील कुर्ला एलबीएस रोड, तसेच अंधेरीतील मिलन सबवे, चुनाभट्टी आणि सायन परिसरात सखल भागात प्रचंड पाणी तुंबलेले त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

मुंबईत दुपारी अडीच वाजेपर्यंत 145 एमएम पाऊस कोसळलेला आहे.त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलेले आहे. यामुळे शहरात अनेक भागातील बेस्ट सेवेचे मार्ग वळविण्यात आले आहेत. घाटकोपर येथील कातोडीपाडा येथील दरड कोसळल्यानंतर घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले आहे. घाटकोपर येथे डोंगराळ टेकड्यांचा परिसर असून येथे नेहमीच दरडी कोसळत असतात. आता घाटकोपर येथील भटवाडी कातोडीपाडा येथे दरड कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मुंबईत प्रचंड पाऊस कोसळत आहे. मुंबई कोकण रिजनमध्ये येत असल्याने मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे

Published on: Jul 21, 2024 04:11 PM
‘गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच…,’ काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
‘मी शरद पवार यांचा अपमान करुच..,’ काय म्हणाले अजितदादा पवार