Jayant Patil on Shivsena MLA | आमदार गेले आसतील तरी ते परत येतील – जयंत पाटील

| Updated on: Jun 21, 2022 | 8:46 PM

मला माहित नाही शिंदे यांच्याबरोबर किती आमदार गेले आहेत. पण हा पुर्णत शिवसेनेचा अंर्तगत विषय आहे.

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला खिंडार पाडत भाजपने आपला उमेदवार निवडूण आणला. त्यावेळी भाजपच्या गोटात आनंद साजरा होत असतानाच राज्यात एकनाथ शिंदे यांनी राजकीय गोंधळ घातला आणि त्याला बंडाचे नाव दिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुजरात गाठत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर युती नको असा सुर आवळला आहे. तर शिवसेने पुन्हा भाजपबरोबर जावं असे म्हटलं आहे. त्यानंतर राज्यात अनेक गोष्टी घडत आहेत. याच दरम्यान भाजपने आपली भुमिका मांडली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्ही वेट अँड वॉच वर असल्याचे म्हटलं आहे. तर याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, मला माहित नाही शिंदे यांच्याबरोबर किती आमदार गेले आहेत. पण हा पुर्णत शिवसेनेचा अंर्तगत विषय आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे याविषयावर मी बोलणं योग्य नाही. तर आमचं सर्व आमदार हे माझ्या संपर्कात आहेत. तसेच शिवसेनेचे गेलेले आमदार हे परत येतील

 

Published on: Jun 21, 2022 08:46 PM
Pankaja Munde | Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
Narayan Rane on Uddhav Thackeray | स्वाभिमान असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-tv9