‘आंबेगावसुद्धा धडा शिकवेल’; वळसे पाटल यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं प्रत्युत्तर

| Updated on: Aug 21, 2023 | 10:22 AM

राज्याचे सहकार मंत्री तथा शरद पवार यांचे अतंत्य विश्वासू मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या मनातील वेदना बोलून दाखवल्या. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदावरून पवार यांनी दोषी ठरवत सवाल उठवले आहेत.

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राज्यकीय जीवनात अनेकांना मोठं केलं आहे. यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. त्यानंतर आता वळसे पाटील यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असं म्हणत टीका केली. त्यावरून आता नवा वाद उफाळला आहे. त्यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटलांवर टीका केली आहे. वळसे पाटलांची नैतिक अधोगती पाहून वाईट वाटलं असा घणाघात आव्हाडांनी केलाय. तर तुमचे हे विचार महाराष्ट्र विसरणार नाही, क्षमा करणार नाही, आंबेगावसुद्धा धडा शिकवेल असं आव्हाडांनी म्हटलं आहे. आव्हाडांनी ही टीका ट्विट करत केली आहे. तर साहेबांचा सर्वांत विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांश नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली असं आव्हाड यांनी टीका केली आहे. तर वळसे पाटील यांनी त्यांच्या बाजूच्या मतदारसंघात देखील पक्षाचा एखादा आमदार निवडून आणू शकले नाहीत असा टोला लगावला आहे.

Published on: Aug 21, 2023 10:22 AM
‘मोदी सरकारमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जगातलं मार्केट बंद’; शरद पवार यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Shravan : पहिला श्रावण सोमवार; त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी