BMC Covid Scam : कूंपनच शेत खातं असा धक्कादायक प्रकार; लाईफलाईनच्या घोटाळ्यात जेजेचा डॉक्टर
ईडीने शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे सुरेश चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्या घरसह 15 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली. यात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचाही समावेश आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यांचा तपास ईडी करत आहे. यावरून ईडीने शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे सुरेश चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्या घरसह 15 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली. यात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचाही समावेश आहे. तर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या अशंगाने महापालिका आणि रूग्णालयांची देखील झाडाझडती ईडीने घेतली. त्यात डॉ. हेमंत गुप्ता या जे जे रूग्णालयातील डॉक्टराचे नाव समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या तीन विभागांचा पदभार काढून घेतला आहे. तर त्यांनी जे तीन विभाग हाताळले होते. त्याविभागांना टाळे ठोकण्यात आले आहे. गुप्ता गेल्या 15 वर्षांपासून जे जे रुग्णालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे ते भागधारक आहेत.