पुन्हा शिवीगाळ सुरू, पण जनतेने धडा शिकवला; मोदी याचं वक्तव्य, काँग्रेसवर सडकून टीका

| Updated on: Apr 29, 2023 | 3:42 PM

त्यांनी हुमनाबादमध्ये जाहीर सभेत काँग्रेसवर टीका करताना, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असा दावा केला. तर या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे.

पुन्हा शिवीगाळ सुरू, पण जनतेने धडा शिकवला; मोदी याचं वक्तव्य, काँग्रेसवर सडकून टीका
Image Credit source: tv9
Follow us on

बंगळुरू : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची (Karnataka Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदी हे विषारी सापासारखे आहेत. जो कोणी चाखेल तो मरेल, असं आक्षेपार्ह विधान केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आज या टीकेला पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी हुमनाबादमध्ये जाहीर सभेत काँग्रेसवर टीका करताना, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असा दावा केला. तर या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला 91 वेळा वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ केली आहे. या शिव्यांच्या शब्दकोशात वेळ वाया घालवण्या ऐवजी काँग्रेसने देश चांगला चालवण्यावर भर दिली असती, तर त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली नसती, असा घणाघात केला आहे.