मुंबई : शालेय शिक्षणातून एका दलित कवीची कविता हटवण्याचा निर्णय कर्नाटक सराकराने (Karnataka Government) घेतला. इयत्ता चौथीत एक दलित कवीची (Dalit Poet) कविता अभ्यासाला होती. ही कवित हटवण्यात यावी, असा आदेश कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे. सूर्य आणि चंद्राला देव न मानणाऱ्या कर्नाटकातील प्रसिद्ध दलिती कवीची कविता वगळण्यात यावी, असे निर्देश देण्यात आलेत. ही कविता धार्मिक भावना दुखावणारी आहे, अशा अनेक तक्रारी कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांना (Education news) आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. दिवगंत कवी सिद्धलिंहैया यांनी ही कविता लिहिलेली होती. वगळ्यात आलेल्या या कवितेचं नाव ‘भूमि’ असं होतं. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.
ही कविता काँग्रेसच्या काळात अभ्यासात आणली गेली होती. बारगुरु रामचंद्रप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला होता. पाठ्यपुस्तकाबाबत करण्यात आलेल्या संशोधन समितीनं ही कविता इयत्ता चौथीच्या अभ्याक्रमात समाविष्ट केली होती.
अनेकांना या कवितेबाबत आक्षेप नोंदवला होता. या पाठ्यपुस्तकातील नाली-काली खंड आपल्या वादग्रस्त माहित्यामुळे काहींच्या धार्मिक भावना दुखावतो, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेकजण सूर्यास आणि चंद्रास देवतेच्या समान मानतात. अशावेळी ही कविता भावना दुखावणारी असून ती शालेय अभ्यासक्रमातून वगळावी, अशी मागणी जोर धरत होती. धार्मिक मठ हे धोका देणारं एक जाळं आहे, अशीही एक ओळ यात लिहिण्यात आली होती.
दरम्यान, तीव्र विरोधानंतर कर्नाटकातील भाजर सरकराने ही कविता वगण्याचा निर्णय घेतला आहे. तीव्र विरोधानंतर रोहित चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीद्वारा सुचवण्यात आलेल्या बदलानंतर अखेर ही कविता अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी.सी नागेश यांनी याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेत.