Ketaki Chitale : केतकी चितळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी! दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?

| Updated on: May 21, 2022 | 8:27 AM

शुक्रवारी केतकी चितळे हिला 2020च्या प्रकरणात पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठाणे : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेच्या जामीन (Ketaki Chitale Bail News) अर्जावर आज सुनावणी होणार आहे. केतकी चितळेवर ठाणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती. 2020 साली दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी केतकीला चार दिवसांची 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आता आज केतकी चितळे (Ketaki Chitale) हीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून दिला दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचंय. सध्या केतकी चितळे हीचा ताबा नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांकडे आहे. 18 मे रोजी वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी केतकीला ठाणे सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी तिला 2020च्या प्रकरणात पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता जामीनासाठी केतकीनं अर्ज केला आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

Published on: May 21, 2022 08:27 AM
‘नवाब मलिकांचे डी-गँगसोबत संबंध होते’ कोर्टाचं निरीक्षण! मलिकांचा पाय आणखी खोलात?
नाशिक शहरात आज पाणीबाणी