नौ साल किया नही कुछ काम,अब करो करो राम..राम, विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

| Updated on: Dec 29, 2023 | 9:21 PM

कॉंग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त विदर्भात उद्या 28 डिसेंबर रोजी भव्य रॅली होत आहे. हा देश सर्वांचा आहे. नागपूरमधून लोकशाहीचा हा बिगुल वाजणार आहे. राहुल गांधीची यात्रा 14 ते 20 जानेवारी चालणार आहे. 85 जिल्ह्यातून साडे सहा हजार किमीचा प्रवास करणार आहे. ही न्याय यात्रा असणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.

नागपूर | 27 डिसेंबर 2023 : कॉंग्रेसच्या स्थापना दिवसाची ऐतिहासिक रॅली विदर्भात होणार आहे. सातशे ते आठशे लोकांच्या बसण्याची व्यवस्था तीन स्टेजवर करण्यात आली आहे. है तय्यार हम, संविधान बचाने के लिए, हा संदेश या रॅलीतून देण्यात येणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. महिलांवरील अत्याचार कमी झाले नाही. ना शेतकऱ्यांना दुप्पट दाम मिळाले नाही. भाजपाने काही काम केले नाही म्हणून विकासाच्या नावावर मत मागता येणार नाही. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेतला जात आहे आणि तो योग्य नाही. आपली गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहोत. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी ही सभा लोकसभा निवडणूकीचा बिगुल असल्याचे विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्ही हृदयात राम ठेवला, भाजपाने त्याचा बाजार मांडला, यांच्या ओठात राम आहे. पोटात राम नाही. ओठातला राम मत मागण्यासाठी हे काढतील, नौ साल किया नही कुछ काम, अब करो करो राम..राम, अशी यांची अवस्था असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 27, 2023 09:53 PM
बावनकुळे यांच्यामुळे भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला, अमोल कोल्हे यांची टिका
नागपूरच्या कॉंग्रेसच्या रॅलीला दहा हजार लोकही जमणार नाहीत, आशीष देशमुख यांची टीका