Video : भररस्त्यात शिकारीचा थरार! बिबट्याने पाडला बैलाचा फडशा, व्हिडीओ महाबळेश्वरचा असल्याची चर्चा

| Updated on: Aug 18, 2022 | 8:34 AM

अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ एका कारचालकाने वाहनातून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओमध्ये रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बैलाची मान धरुन ठेवत बिबट्याने शिकार केली. यावेळी या वाहनधारकाने बैलाची सुटका बिबट्याच्या तावडीतून करण्यासाठी गाडीचा हॉर्नही वाजवला होता.

अंगावर काटा आणणारे जंगली (Wild Animals) प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Leopard Viral Video) व्हायरल होताना आपण बघितले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळील तापोळा राज्य मार्गावर रस्त्याच्या कडेने एक बैल जात असताना बिबट्याने त्याची शिकार केली असल्याचा, यात उल्लेख केला आहे. अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ एका कारचालकाने वाहनातून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओमध्ये रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बैलाची मान धरुन ठेवत बिबट्याने शिकार केली. यावेळी या वाहनधारकाने बैलाची सुटका बिबट्याच्या तावडीतून करण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजवून तसेच जोर जोरात आरडाओरडा केला. मात्र बिबट्याने बैलाल आपल्या तावडीतून सोडलं नाही. उलट शिकार करत बैलाला जंगलाच्या दिशेने ओढून नेलं.

Published on: Aug 18, 2022 08:34 AM
Special Report | निधी वाटपात भाजपच नंबर 1
Video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! वसईत थोडक्यात स्कूल बसचा मोठा अपघात टळला, 50 विद्यार्थी बालंबाल बचावले