मविआ आणि महायुतीत लोकसभांच्या जागांवरुन मोठा भाऊ बनण्याची लागली स्पर्धा

| Updated on: Dec 31, 2023 | 10:17 PM

महाविकास आघाडी आणि महायुतीत लोकसभेच्या जागांवरून घुसफूस सुरु झाली आहे. युती आणि आघाडीमध्ये पहिल्यांदा तीन-तीन पक्ष आल्याने लोकसभेच्या जागावरुन तिडा निर्माण होऊ शकतो. त्यातच आठवले यांची रिपाईने दोन जागा मागितल्या आहेत. तसेच प्रहार संघटनेचे बच्चूकडू यांचे समाधान करावे लागणार आहे.

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : महा विकास आघाडी आणि महायुतीत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जितक्या जागांसाठी आग्रह धरला आहे त्यावरुन दोन्ही गटांना मोठा भाऊ होण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये 23 जागा मागितल्यानंतर शिंदे गटाने महायुतीमध्ये 22 जागांची मागणी केली. काल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी परंपरेप्रमाणे 22 जागांची मागणी केली आहे. 2019 लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेने 23 आणि भाजपाने 25 जागा लढल्या होत्या त्यापैकी शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते. त्यातील 13 खासदार शिंदे गटाकडे तर 5 खासदार ठाकरे गटाचे गेले आहेत. आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुती गेल्याने जागांचा पेच वाढू शकतो. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Dec 31, 2023 10:15 PM
पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त भेट ? चर्चेला सुरुवात
अत्यंत कमी खर्चात लग्न केले, नव दाम्पत्य मनोज जरांगेंच्या भेटीला आले