MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 July 2021

| Updated on: Jul 03, 2021 | 8:35 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती.

खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. (Cabinet Minister Subhash desai appointed committee to probe mining tender process)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपुरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यिय समिती गठित केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 AM | 3 July 2021
Bandatatya Karadkar | बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, समर्थकांची प्रतिक्रिया LIVE