मराठी लोकांपर्यंत योजना पोचवणारच; शंभुराज देसाई यांची कर्नाटकला तंबी
मराठी भाषिक गाव, लोकांना कर्नाटक सरकारकडून योजना, सुविधा मिळत नाहीत उलट त्यांच्यावर कन्नड सक्ती केली जाते त्यांच्यावर अन्याय केला जात आहे
मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमाभागात 865 गाव येतात. तर सध्या सिमावाद हा न्यायप्रविष्ठ विषय असून याप्रकरणी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालत समन्वयाने हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र जर योजना पोचवण्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अडवणूक करत असतील तर ते योग्य नाही. तर त्या योजना आणि सुविधा आम्ही देणारच असे कर्नाटकाला शंभुराज देसाई यांनी सांगितलं. मराठी भाषिक गाव, लोकांना कर्नाटक सरकारकडून योजना, सुविधा मिळत नाहीत उलट त्यांच्यावर कन्नड सक्ती केली जाते त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून या गावांना योजना, सुविधा देण्यात येणार आहेत. याच्याआधीच्या सरकारने तसं काहीच केलं नाही. तर कर्नाटक सरकार याला विरोध करत आहे. पण लोकांच्या मागणीवरून मराठी लोकांपर्यंत या योजना पोचवणारच असल्याचा निर्धार त्यानी बोलून दाखवला.