Video: मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज,गेट वे ऑफ इंडिया परिसरातून आढावा, पाहा…
मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. असा धमकीचा फोन आल्याने मुंबईतील पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. 26 /11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज आला आहे. काही दिवसांआधी संशयास्पद बोट हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली होती. त्यानंतर ही बोट चुकून आपला मार्ग भरकटल्यामुळे हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन […]
मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. असा धमकीचा फोन आल्याने मुंबईतील पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. 26 /11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज आला आहे. काही दिवसांआधी संशयास्पद बोट हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली होती. त्यानंतर ही बोट चुकून आपला मार्ग भरकटल्यामुळे हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणज ही बोट शस्त्रास्त्रांनी भरलेली होती. त्यानंतर आता हा आलेला धमकीचा मेसेज यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी ब्रिजभान जैसवाल यांनी गेट वे ऑफ इंडिया (Gate Way Of India) परिसरातून आढावा घेतलाय…
Published on: Aug 20, 2022 03:01 PM