निवडणूक जिंकल्यावर सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथीली तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

| Updated on: Feb 03, 2023 | 8:07 AM

अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा असणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणून आल्यावर सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथीली तांबे यांची पहिली प्रतिक्रिया... म्हणाल्या...

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. तर 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजयी झाले. या विजयानंतर सत्यजित यांच्या पत्नी मैथीली तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्यजित आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन … सगळ्यांच्या कष्टामुळे आजचा हा विजय पाहता आला. मित्र परिवार आणि नातेवाईकांचे आभार, जनतेचे आभार… मला खात्री आहे की सत्यजित काय लोकांच्या हितासाठी काम करत राहतील. जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतील यात कुठलीच शंका नाही”, असं मैथिली म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 03, 2023 08:07 AM
विधानपरिषदेच्या तीन जागांवर मविआची आघाडी, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!; बच्चू कडू असं का म्हणाले?