पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी उद्योजक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अखेर डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चोक्सीची धरपकड केली. चोक्सीचा नवीन फोटो समोर आला आहे. मेहुल चोक्सी मध्य अमेरिकेतील अँटिग्वाहून पसार झाला होता. अँटिग्वामधून तो क्युबाला पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.