मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?

| Updated on: Nov 03, 2024 | 5:55 PM

राज्यमंत्री मंडळाने देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या रत्नागिरी येथील घरी गाय आणलेली आहे. त्यांना ही गाय कण्हेरी मठाने भेट दिलेली आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी गायीचे प्रेमाने लाड पुरविले आहेत.

Follow us on

राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकताच देशी गायींना राज्यमाता असा दर्जा दिलेला आहे. परंतू मंत्रिमंडळातील एक सदस्य उद्योग मंत्री उदय सामंत यांना गोमतेचा लळा लागला आहे. राजकारण आणि निवडणूकांच्या धामधुमीत वेळात वेळ काढून उदय सामंत यांनी गोमातेसोबत वेळ घालवला आहे. उदय सामंत यांना ही गाय भेट मिळाली आहे. देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देण्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्यावेळी ही गोमात देऊन माझा सत्कार कण्हेरी मठात करण्यात आला होता. या गायीचे नाव कण्हेरी मठातच ‘मंगलगंगा’ असे  ठेवण्यात आले आहे असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीत मी घरी आल्यावर तिला भेटल्यानंतर एक उत्साह निर्माण होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.आज दिवाळी असल्याने प्रचाराला कुठे जायचे नसल्याने आपण गायीशी खेळत असल्याचे सामंत यांनी सांगितले.