आमदार Bhaskar Jadhav यांनी ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली

| Updated on: Mar 18, 2022 | 1:35 PM

शिमगोत्सवाला (Holi) शिवसेना आमदार भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) नेहमी हटके अंदाज पहायला मिळतो. आज देखील भास्कर जाधवांचा हटके अंदाज पहायला मिळाला, ग्रामदेवतेची पालखी त्यांनी नाचवली. 

शिमगोत्सवाला (Holi) शिवसेना आमदार भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) नेहमी हटके अंदाज पहायला मिळतो. आज देखील भास्कर जाधवांचा हटके अंदाज पहायला मिळाला, ग्रामदेवतेची पालखी त्यांनी नाचवली.  दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे देखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण (chiplun)  तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली.  आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार भास्कर जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. मुंबईतून आज पहाटे ते अचानक गावात दाखल झाले. आजदेखील गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर भास्कर जाधव पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते.

Published on: Mar 18, 2022 01:35 PM
होळीनिमित्त जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा
सिग्‍नल शाळेतील मुलांसोबत मराठी कलावंतांची होळी