Special Report | टोलफोडवर राजकारण तापलं; मनसे-भाजप आमने सामने; भाजपच्या ट्विटला देशपांडे यांचे उत्तर
सिन्नर टोलनाका फोडल्यावरून आता भाजप-महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या कारणावरून सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यानंतर आधी ट्विटर वॉर आणि त्यानंतर आता शाब्दीक जुगलबंदी लागलेली आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाका फोडल्यावरून आता भाजप-महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या कारणावरून सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यानंतर आधी ट्विटर वॉर आणि त्यानंतर आता शाब्दीक जुगलबंदी लागलेली आहे. टोलनाका फोडल्याने भाजपकडून ट्विट करत अमित ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी ठाकरे यांना टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा टोला भाजपकडून लगावण्यात आला होता. तर त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मणिपूरमधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजप महाराष्ट्रातील मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का? असा सवाल केला आहे. त्याचदरम्यान राज्याच्या पावसाळी अधिवेशनात देखील भाजपकडून टीका करण्यात आली. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांना मनसेवर टीका करताना, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याचा धर्म, जात, प्रांत, भाषा, वेश याच्या पलिकडं जाऊन कायद्याचं राज्य आणण्याचं काम आमचं सरकार करेलं असे म्हणत थेट इशाराच दिला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.