Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ

| Updated on: Apr 09, 2025 | 8:59 AM

MNS Sandeep Deshpande Audio Clip : मनसे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञात इसमाकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

मनसे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना एका अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे. शिवीगाळ करत संदीप देशपांडे यांना आज्ञाताकडून धमकी देखील देण्यात आलेली आहे. याप्रकरणी देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. तर संदीप देशपांडे यांच्याकडून देखील या शिवीगाळ करणाऱ्या अज्ञात इसमाला शिवीगाळ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Published on: Apr 09, 2025 08:59 AM