खडकवासला चौपाटी परिसरात असं काय झालं की थेट खासदार सुळे यांना खाली उतरावं लागलं? काय केलं पहा?
वाहतूक कोंडींत पुण्याने मुंबईलाहबी मागे टाकल्याचं बोललं जात. आता याचा प्रत्यय खासदार सुप्रिया सुळे यांना आल्याचे पहायला मिळत आहे. यायासंदर्भात त्यांनी स्वत:च एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एसटीच्या शिवशाही बसच्या दुरावस्था आणि पुण्यातील वाहतूक कोंडी दाखवली आहे.
पुणे : येथील वाहतूक कोंडी बाबत अनेक नेते आणि स्थानिक सदा बोलत असतात. त्यावर अजूनही काहाही उपाय निघालेला नाही. वाहतूक कोंडींत पुण्याने मुंबईलाहबी मागे टाकल्याचं बोललं जात. आता याचा प्रत्यय खासदार सुप्रिया सुळे यांना आल्याचे पहायला मिळत आहे. यायासंदर्भात त्यांनी स्वत:च एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एसटीच्या शिवशाही बसच्या दुरावस्था आणि पुण्यातील वाहतूक कोंडी दाखवली आहे. त्यामुळे मिरज डेपोच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधलं गेलंच या व्हिडिओमुळे खासदार ते ट्रँफिक हवालदार ही कृतीही सुळे यांची पाहता आली. खासदार सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली. ही घटना पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. येथे यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे देखील या मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी ट्राफिक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे सध्या यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.