सुपर्ब.. अमेरिकेत असल्यासारखंच वाटतंय, वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रतिक्रिया पाहिल्या का?

| Updated on: Oct 08, 2022 | 11:14 AM

ताशी कमाल 200 किमी वेगाने ही रेल्वे धावते. तसेच रेल्वेतील आसन व्यवस्थाही अगदी आरामदायी करण्यात आली आहे.

सुपर्ब.. अमेरिकेत असल्यासारखंच वाटतंय, वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रतिक्रिया पाहिल्या का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुमित सरनाईकः नुकत्याच मुंबई-अहमदाबाद (Mumbai Ahemdabad) वंदे भारत एक्सप्रेसमध्ये (Vande Bharat Ekpress) अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असा हा प्रकल्प आहे. या रेल्वेचा प्रवास कसा आहे, याविषयी टीव्ही9 ने प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एका महिला प्रवाशाने अत्यंत समाधानकारक प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

अन्य एका महिलेने Excellent अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या ट्रेनने अहमदाबादला जायला ८ तासा लागायचे. पण आता 8 तासात ही ट्रेन पोहोचते. त्यामुळे मेक इन इंडिया असलेल्या ट्रेनचा खूप फायदा झाला. मुंबईसाठी अशा अनेक ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

एका प्रवाशाने अमेरिकेतल्या प्रवासा सारखाच हा प्रवास वाटत असल्याचं म्हटलं.

30 सप्टेंबर रोजी वंदे भारत एक्प्रेसच्या तिसऱ्या रेल्वेचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.

ताशी कमाल 200 किमी वेगाने ही रेल्वे धावते. तसेच रेल्वेतील आसन व्यवस्थाही अगदी आरामदायी करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसला मणिनगर रेल्वे स्टेशनच्या जवळ अपघात झाला होता. म्हशींच्या ताफा रेल्वेच्या इंजिनावर धडकला होता.

त्यामुळे इंजिनाच्या कव्हरचा भाग फुटला होता. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसवरून अनेक नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

मात्र या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनमध्ये किंवा इतर यंत्रणेत काहीही बिघाड झाला नसल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. फुटलेला पार्ट बदलून एका रात्रीतून ट्रेन पुन्हा चकाचक करण्यात आली.