लालबाग परळ भागात बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो आणि टोला शिवसेनेला!

| Updated on: Sep 29, 2022 | 8:39 AM

भाजपच्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच यंदा मोठी बॅनरबाजी सुरु आहे. लालबाग परळ येथील रस्त्यांवर भाजपने मोठे बॅनर्स लावले आहेत.

विनायक डावरुंग, मुंबईः बदल मातृशक्तीतील सन्मानाचा… मुंबईतील भ्रष्टाचाराच्या (Corruption) निर्मूलनाचा.. असे बॅनर्स (Banners) सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरलेत. अर्थातच आगामी मनपा निवडणुकांसाठी (BMC Election)  भाजपने हे सूचक बॅनर्स लावलेत. यंदा मुंबई काबीज करायची या उद्देशाने भाजपने मोठे राजकीय डावपेच आखले आहेत. मुंबईतल्या प्रत्येक प्रसंगाला राजकीय किनार दिसून येतेय. दहीहंडी, गणपतीनंतर आता नवरात्रीत भाजपने पक्षासाठी वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच यंदा मोठी बॅनरबाजी सुरु आहे. लालबाग परळ येथील रस्त्यांवर भाजपने मोठे बॅनर्स लावले आहेत. नवरात्रीच्या मंडळांना भाजपने मोठी आर्थिक मदतही केली आहे.

Published on: Sep 29, 2022 08:39 AM
4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 September 2022 -TV9
“बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते जनतेवर राग काढताहेत”