मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे. रामदास कदम दळभद्री माणूस आहेत. त्यांनी आधी केलेली वक्तव्य पाहावीत. अडीच वर्षात मातोश्रीचा पायरी तरी चढले होते का?, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे इतके विद्वान आहेत की तुम्हाला त्यांच्याकडून आयुष्यभर शिकायला लागेल, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. त्यावर अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.