महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा सरकार लपवतंय; संजय राऊत आक्रमक

| Updated on: Apr 20, 2023 | 11:24 AM

Sanjay Raut on Maharashtra Bhushan Pursakar 2022 : सरकार आकडे लपवत आहे. 50 ते 75 जणांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लाखो श्रीसेवकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाला. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.लोकांना खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, सरकारने व्यवस्था का नाही केली?, असा सवाल राऊतांनी केला आहे. श्रीसेवकांनी काही खाल्लेलं नव्हतं. तशी काही व्यवस्था नव्हती. पैसे देऊन तोंड बंद करण्याचं काम केलं जातंय, असं राऊत म्हणालेत. सरकार आकडे लपवत आहे. माझ्यामते 50 ते 75 जणांचा मृतांचा आकडा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था नाही कोणती मोगलाई लागली आहे?, असंही राऊत म्हणाले आहेत.

Published on: Apr 20, 2023 11:10 AM
खारपाणपट्ट्यातील पाणी पुरवठा योजनाच फडणवीसांनी रद्द केली; राऊत यांचा सरकारवर घणाघात
मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलंय का? म्हणत फडणवीस यांच्यावरही राऊत बरसले; म्हणाले, त्यांना मन…