Churchgate Water logging : पावसामुळे मुंबईच्या चर्चगेट परिसरात गुडघाभर पाणी

| Updated on: Jul 27, 2023 | 12:57 PM

Churchgate Water logging : मुंबईत धुवाधार पाऊस सुरु आहे. सहसा पाणी साठत नाही, त्या चर्चगेट परिसरात पाणी साचलं आहे. पाण्याचा म्हणावा तसा निचरा होत नाहीय.

Follow us on

मुंबई : मुंबईत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे मुंबईचा चर्चगेट परिसर जलमय झाला आहे. चर्चगेट परिसरात ट्रॅकवर पाणी आलं होतं. स्टेशनला लागून असलेल्या रस्त्यावर पाणी साचलं आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी पंप लावले आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप ज्या गटारात सोडला आहे, तिथून म्हणावा तसा पाण्याचा निचरा होत नाहीय. स्टेशनच्या बाहेर लागून असलेला रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबईत आज ऑरेंज अलर्ट आहे. पावसाचा जोर अजून कमी झालेला नाहीय. गुडघाभर पाणी साचलय. त्यातून नागरिक आणि वाहनं मार्ग काढतायत. असाच पाऊस सुरु राहिला, तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचू शकतं.