“शिंदे सरकार सध्या हवेत, सरकारच्या फक्त दिल्लीवाऱ्या सुरु”, काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
Nana Patole, CM Eknath Shinde, Delhi Tour
नागपूर, 22 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचनाक दिल्लीला रवाना झाले आहेत. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “राज्य सरकार हवेत आहे. जमिनीवर यायला तयार नाही. कोणाचे आमदार वाढतात, कोणाचा मुख्यमंत्री होणार आणि सारख्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. जनतेचं काही देणं घेणे नाही. “
Published on: Jul 22, 2023 12:40 PM