नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानावरून दिला मोठा सल्ला

| Updated on: Aug 06, 2023 | 4:25 PM

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह हेच देशाचं नेतृत्व करू शकतात असेही ते म्हणाले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.

पुणे, 06 ऑगस्ट 2013 |आज पुणे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्याचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हे महाआरोग्य शिबीर सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फडकेबाजी केली. त्यांनी आरोग्य आणि फिटनेसवरून मंत्री गिरिष महाजन यांचे कौतूक केलं. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबाबतही तोंड भरून बोलले. त्यांनी, आदरणीय अमित भाई गुजरातमधून आले आहेत, पण त्यांना महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह हेच देशाचं नेतृत्व करू शकतात असेही ते म्हणाले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. पटोले यांनी, कोर्टात वकिल असतात. ते खोटी आणि खरी अशी दोन्ही बाजू मांडतात. तर कालपर्यंत कमळाबाईला शिव्या घालणारे आज भाजपची वकिली करत आहेत. तर अजित पवार यांचे जुने भाषण हे सोशल मिडियावर येतच असतात. आता अजित पवार यांनी त्यांचे पात्र आणि वकिलीही बदलली असा टोला लगावला आहे. तर त्यांनी चुकीची वकिली करू नये असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 06, 2023 04:25 PM
अमित शाहांसोबत गुप्त भेट अन् लवकरच भाजपमध्ये जाणार?, सुरू असलेल्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच म्हणाले…
आंबोली पासून जवळच असलेला ‘हा’ धबधब्याला पर्यटकांची पसंती, उसळतेय पर्यटकांची गर्दी