नागपूर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मृतांचा आकडा आता वाढला आहे. या अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 747 लोक जखमी झाले आहेत. तर 56 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर देशातील विरोध पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओडिसा मधील अपघाताची वास्तविकता वेगळी आहे. ते तपात समोर येईल. देशात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली पाहीजे, त्यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे.