Nana Patole On Government | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सरकारला घेरणारच, नाना पटोले यांचा इशारा

| Updated on: Aug 24, 2022 | 4:08 PM

Nana Patole On Government | पावसाळी अधिवेशनाचे दोन दिवस उरले असले तरी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Nana Patole On Government | पावसाळी अधिवेशनाचे (Monsoon Session) दोन दिवस उरले असले तरी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. अधिवेशनात विरोधकांनी एकत्र येत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर 50 खोके एकदम ओके हा नाऱ्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तर आता सभागृहात प्रश्नांनी विरोधकांनी सरकारला भांडावून सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांचा काळा छिठ्ठा आपल्याकडे असल्याचे सुतोवाच केल्यानंतर सध्या तपास यंत्रणाच त्यांच्याकडे असल्याने या प्रश्नी काय बोलणार असा टोला पटोले यांनी लगावला. तर दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी 50 लाख काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देऊ असं वक्तव्य केलं, त्यावर तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडे आहे, विरोधकांकडे नाही, असा टोलाही पटोले यांनी सरकारला हाणला.

Published on: Aug 24, 2022 04:08 PM
Ambadas Danve on Kale | ‘कोण हा गजानन काळे?’, अंबादास दानवे यांचा पलटवार
Eknath Khadse : विचारांची लढाई विचारांनीच व्हावी, एकमेकांच्या अंगावर जाणं योग्य नाही; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया