सगळ्या मागण्या मान्य होतीलच असं नाही, पण…; शेतकरी आंदोलनासंदर्भात मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य

| Updated on: Mar 16, 2023 | 7:51 AM

Dada Bhuse on Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आज होणाऱ्या बैठकीबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

नाशिक : शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आजच्या बैठकीबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. “शेतकऱ्यांच्या एकूण 14 मागण्या आहेत. यावर कमी अधिक प्रमाणात चर्चा झाली आहे. सर्व विषय मार्गी लागणार नाही, पण अनेक योजनाांबाबत निर्णय झाले आहेत. 40 ते 50 टक्के मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झालीय. माझं असं म्हणणं नाही की, सगळ्याच मागण्या मान्य होतील. पण जास्तीत जास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं दादा भुसे म्हणालेत. आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा होईल. विश्वास आहे की, सकारात्मक चर्चा होईल. आज दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे, अशी माहितीही दादा भुसे यांनी दिली आहे.

Published on: Mar 16, 2023 07:42 AM
कोण कोणाच्या मागं हे शोधण्यापेक्षा…; जयंत पाटील यांचं सरकारला आव्हान
अनेक घरं उध्वस्त मात्र…; आप्पा पाडा परिसराताल नागरिकांचे ठिय्या आंदोलन