पहाटेच्या शपथविधीला अजितदादा गेले होते तो पक्षाचा निर्णय होता; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 18, 2023 | 11:10 AM

Dilip Bankar on Ajit Pawar : 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, पाहा संपूर्ण व्हीडिओ...

नाशिक : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या वेळी अजित दादा गेले होते तो देखील पक्षाचा निर्णय होता, असं बनकर म्हणाले आहेत. आम्हाला शपथ विधी साठी फोन करून बोलावलं होतं. यावेळेस देखील शरद पवारसाहेब आणि अजितदादा निर्णय घेतील. सध्या तरी आम्हाला कोणताही फोन नाही किंवा निरोप आलेला नाही, असं दिलीप बनकर म्हणाले आहेत. पेपरमध्ये काय बातम्या आल्या माहिती नाही. पण अजित दादा असा निर्णय घेणार नाहीत. ते जो निर्णय असेल तो पक्षाचा असेल, असंही बनकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 18, 2023 10:26 AM
अजित पवार भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ‘या’ ३ आमदारांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले…
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र कायम, मृत्यूचं एकच मोठं कारण आलं समोर; बघा कोणतं