शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर येणार आहेत
कारण येत्या काळात पालिकेच्या कधीही निवडुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या भेटीचा फायदा उद्धव ठाकरे यांना नक्की होणार आहे.
नाशिक – शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर येणार आहेत. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा देणार विश्वास देणार आहेत. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदार सध्या शिंदे गटात दाखल झाल्यानंतर नाराज कार्यकर्ते भेट घेणार आहेत. मात्र नगरसेवक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा देणार उद्धव ठाकरेंना विश्वास देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांना एक प्रकारं आव्हान आहे. कारण येत्या काळात पालिकेच्या कधीही निवडुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या भेटीचा फायदा उद्धव ठाकरे यांना नक्की होणार आहे.
Published on: Jul 24, 2022 10:37 AM